Ad will apear here
Next
पंढरपूरच्या विकासासाठी कॅनडाचे दोन हजार कोटी
पंढरपूर : ‘शहराच्या विकासासाठी कॅनडा सरकारने आर्थिक साह्य करण्याची घोषणा केली आहे. कॅनडा सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे,’ अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी दिली.

भारत आणि कॅनडा सरकारच्या मैत्रीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परदेशी शहराच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्याला तत्त्वतः मंजुरी देण्यात आली.

कॅनडा सरकारचे प्रतिनिधी आणि मंदिर समिती अध्यक्ष अतुल भोसले तसेच राज्य सरकार प्रशासन अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर पंढरपूर शहराचा विकास करण्याची घोषणा करण्यात आली. तीन ऑक्टोबरला ‘कौन्सिल जनरल ऑफ कॅनडा’ पंढरपुरात येणार आहेत.

या योजनेसाठी कॅनडा सरकार आणि मंदिर समिती, तसेच नगर परिषद यांच्यात करार होणार आहे. पंढरपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी जवळपास दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक कॅनडा सरकार करणार आहे. कॅनडा ट्रेड कॉर्पोरेशनच्या वतीने हे काम हाती घेतले जाणार आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZOABG
 It is now more than a year - and - a - half . Is it time to ask the
question - what has been done , what is being done , who is
Responsible for what . What is napping to the money not
spent .
Similar Posts
बार्शी पोलीस ठाण्याचे उद्घाटन सोलापूर : ‘बार्शी तालुका पोलीस ठाण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जलद सेवा मिळेल,’ असा विश्वास पालकमंत्री विजय देशमुख यांनी बार्शी येथे व्यक्त केला.
श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाच्या अध्यक्षपदी डॉ. अतुल भोसले पंढरपूर : येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार डॉ. अतुल भोसले यांनी नुकताच स्वीकारला. या वेळी त्यांनी मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांकडून कामकाजाची माहिती घेतली. तसेच देवस्थानतर्फे उभारण्यात येत असलेल्या भक्त निवासाच्या कामाची पाहणी करून ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले
दगडे यांना कृतिशील शिक्षक पुरस्कार जाहीर सोलापूर : आष्टी (ता. मोहोळ) येथील नूतन विद्यालयाचे सहशिक्षक हनुमंत श्रीरंग दगडे यांना आमदार दत्तात्रय सावंत यांच्या महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचा कृतिशील शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘मेगा क्लस्टरबाबतच्या सर्व समस्या सोडवणार’ सोलापूर : ‘सोलापुरात मंजूर झालेल्या मेगा क्लस्टरसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यास तयार असून, वस्त्रोद्योग उद्योजकांच्या सर्व समस्या सोडवण्याला प्राधान्य देणार आहे. त्याचबरोबर आपली बलस्थाने वापरून वस्त्रोद्योग व्यवसायाला पुनर्वैभव प्राप्त करून देणार,’ असे आश्वासन सहकार तथा वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language